esakal | कोरोना नियमाचे उल्लघंन करणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करावाई करा, भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

सर्वसामान्याला वेगळा न्याय आणि मंत्र्यांना वेगळा न्याय ही भूमिका चुकीची आहे.

कोरोना नियमाचे उल्लघंन करणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करावाई करा, भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आनंदोत्सव साजरा करताना कोरोनाचे नियमाचे उल्लघंन करणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या सहाकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी निवेदन देण्यात आले.   श्री.केणेकर म्हणाले की, सर्वसामान्याला वेगळा न्याय आणि मंत्र्यांना वेगळा न्याय ही भूमिका चुकीची आहे. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करता आणि राज्यमंत्री सत्तार हे आनंदोत्सव साजरा करताना मास्क वापरत नाही. फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायलर झाले आहेत.

कोरोना बाधित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नातेवाईकांना संसर्ग होऊ नये म्हणून वीस किलोमीटर गेला पायी चालत

त्यांच्यावर कुठलीच कारवाई करीत नाही. हा कुठला न्याय आहे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. सर्वसमान्य ते मंत्री सर्वांना न्याय हा समान दिला पाहिजे. तेव्हाच तुमच्यावर लोक विश्‍वास ठेवतील. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लावले. तेव्हा व्यापाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र सरकारच्या आदेशाने जीवनावश्‍यक वस्तू सोडता सर्व बंद ठेवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या डोक्यात धोंडा घातल्यागत निर्णय घेतल्यामूळे सर्वांचे नुकसान होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांना दुकान उघडे ठेवण्यास मदत करावीत. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुट देण्यात यावी अशी मागणीही श्री.केणेकर यांनी केली आहे. यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे, समीर राजूरकर, राजू शिंदे, बबन नरवडे, राजेश मेहता उपस्थित होते. 

संपादन - गणेश पिटेकर