
औरंगाबाद : महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील (Siddharth Zoo) प्राणी सुरक्षित असून, कोरोना चाचण्यासंदर्भात (Corona Test) केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (Central Zoo Authority Of India) अद्याप आदेश दिलेले नाहीत. चाचण्या करण्याच्या सूचना आल्याच तर पथकाला पाचारण केले जाईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी सांगितले. देशातील काही प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्राण्यांना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. औरंगाबाद महापालिकेतर्फे प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरील फुटपाथ पी. पी. लोशनने भरून ठेवण्यात येत आहेत व चुना पावडर ठेवण्यात येत आहे. (Aurangabad Live News Team Will Be Call For Wild Animals Corona Test)
मांसाहारी प्राण्यांना देण्यात येणारे बिफ गरम पाण्यात बुडवून देण्यात येते. २४ तास स्वच्छ पाणी दिले जात आहे. वाघांच्या पिंजऱ्यात कर्मचारी प्रवेश करताना आधी पाय पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्यात निर्जंतुक करतात. सर्व प्राण्यांची पशुवैद्यकांमार्फत आरोग्य तपासणी केली जात आहे. प्राणीसंग्रहालयात सोडीमय हायपोक्लोराईड मिश्रित पाण्याची फवारणी केली जात आहे. आतापर्यंत प्राणी सुरक्षित असले तरी इतर प्राणीसंग्रहालयाप्रमाणे प्राण्यांच्या चाचण्या करणार का? असा प्रश्न केला असता, श्री. पांडेय यांनी सांगितले की, अद्याप केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे चाचण्या करण्याचा प्रश्नच नाही. काही सूचना आल्या, तर चाचण्या करण्यासाठी पथकाला पाचारण केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.