esakal | Admission: लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत मिळणार सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Admission: लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत मिळणार सूचना

Admission: लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत मिळणार सूचना

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ जागांसाठी ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सोडतीमध्ये नंबर लागलेल्या पालकांना एसएमएस मिळाले नाही. परंतु त्यांच्या संकेतस्थळावरिल लॉगिनमध्ये सोडतीत त्यांची निवड झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाणार आहे.

कोरोनामुळे पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरीता पडताळणी समितीकडे जाऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यंदा क्षमतेपेक्षा चार पटीने अर्ज आले आहेत. दरम्यान प्रवेशासाठीची पहिली सोडत गुरुवारी (ता. १५) शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये तीन हजार ४७० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात शिक्षण विभागाने तूर्तास प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे ३० एप्रिलनंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सुचना दिली जाणार आहे.