esakal | आरोग्य कर्मचाऱ्यांचा अजब कारभार, लसीकरण व कोरोना चाचणी एकाच ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

आडुळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) :  जिल्हा परिषद प्रशालेत लसीसाठी झालेली नागरिकांची गर्दी.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा अजब कारभार, लसीकरण व कोरोना चाचणी एकाच ठिकाणी

sakal_logo
By
मुनाफ शेख

आडूळ(जि.औरंगाबाद) : आडूळ (ता.पैठण) (Paithan) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Primary Health Centre Adul) मंगळवारी (ता.११) येथील जिल्हा परिषद प्रशालेत ६५ वर्षांवरील ज्यांनी पहिली लस घेतली, अशा नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र येथे लसीकरण होत असल्याची माहिती मिळताच लस घेण्यासाठी आडुळसह परिसरातील तब्बल पन्नासच्यावर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ तर उडाला. शिवाय येथे कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांच्या जिवाशी खेळ खेळत येथेच कोविड १९ चाचण्या (Covid 19 Test) घेतल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यपद्धती वरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination Site) कोणतेच पूर्व नियोजन नसल्याने मंगळवारी सकाळी सकाळी सहा वाजल्यापासून आलेल्या नागरिकांचा लसीकरणावरून वाद निर्माण होऊन मोठा गोंधळ उडाला तर काही नागरिकांना लस न मिळाल्याने त्यांना परत जावे लागले. (Aurangabad Live Updates Covid Test, Vaccination Site At Same Place In Adul Paithan)

हेही वाचा: औरंगाबादेत लसटंचाई राहणार ३० जूनपर्यंत!

या आरोग्य केंद्राअंर्तगत ३६ गावे येतात. परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. ३६ गावांतील नागरिकांसाठी आडूळ येथे एकच लसीकरण केंद्र असल्याने खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करित आहेत. मंगळवारी सकाळी ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविडचा दुसरा डोस देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला येथे कमी प्रमाणात लसचा साठा उपलब्ध झाला होता. परंतु येथे ढिसाळ नियोजन असल्याने लसीकरणावरून भर उन्हात रांगेत उभे असलेल्या नागरिकांचा अचानक एकच मोठा गोंधळ उडाल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली होती.

कोविशिल्डचा पहिला किंवा दुसरा डोस मिळावा म्हणून परिसरातील नागरिक केंद्रात गर्दी करीत आहेत. शासनाचे कडक निर्देश असताना देखील येथे कोणतेही शारीरिक अंतर पाळले जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लसीकरण केंद्रात आरोग्य विभागाचे कर्मचारी धनदाडग्यांना वशिल्याबाजीने लसीकरण करीत असल्याचा आरोप संतप्त झालेल्या नागरिकांनी केला आहे.