औरंगाबाद : अंबा निर्यातीला विम्याचे कवच देण्यासाठी प्रयत्न

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची ग्वाही : डॉ. भगवानराव कापसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
Aurangabad mango export provide insurance cover Bhagwat Karad
Aurangabad mango export provide insurance cover Bhagwat Karadsakal

औरंगाबाद : अंबा निर्यातीसाठी विम्याचे संरक्षण मिळाले तर अंबा निर्यातीचे प्रमाण वाढेल. यासाठी आंब्याची निर्यात करताना त्याला विमा संरक्षणाचे कवच देण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करू. तसेच औरंगाबाद येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून एअर कार्गोद्वारा अंबा निर्यातीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

फळबागतज्ज्ञ व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांच्या ‘आंबा : अतिघन लागवड ते निर्यात'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. भानुदासराव चव्हाण सभागृहात डॉ. कराड यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कडाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. शंकरराव नागरे उपस्थित होते. मंचावर पुस्तकाचे लेखक डॉ.कापसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकादास पाथ्रीकर, महानंदचे माजी अध्यक्ष नंदलाल काळे, महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष सुशिल बलदवा, मुकुंद एक्सपोर्टर्सचे पंकज गथाने, अशोक सिरसे, सुधाकर दानवे, बापूसाहेब भोसले, मकरंद कोर्डे, एस. बी. शिंदे, संजय पापडीवाल यांची उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी, निवृत्त जीवनात लोक कुटुंबात व्यस्त होतात. मात्र डॉ. कापसे यांनी आंबा लागवड, निर्यातीबाबत संशोधन करून, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून ‘आंबा : अतिघन लागवड ते निर्यात' पुस्तक लिहिल्याचे गौरवोद्गार काढले. मराठवाड्यात प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र मराठवाड्यात व्हावे, अशी मागणी केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन हे केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

डॉ. नागरे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी पर्यायी पीक म्हणून आंबा लागवडीचा विचार करण्याची सूचना केली. श्री. गथाने, श्री. पाथ्रीकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. कापसे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. यावेळी पुस्तकाचे प्रकाशक विकास कापसे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजीव साठे यांनी तर आभार प्रदर्शन आकाश महाजन यांनी केले.

क्लस्टर होण्यात डॉ. कापसेंचे योगदान

राज्याचे फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, जायकवाडी धरणाच्या खाली ५२ कोटीचे मोसंबी क्लस्टर होण्यात डॉ. कापसे यांचे मोलाचे योगदान आहे. फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे, यंदा ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पुढील वर्षात हे क्षेत्र एक लाख हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन आहे. फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. मनरेगातुन शेततळे आणि सोबतच प्लास्टिक अच्छादनदेखील दिले जाणार आहे. फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com