Marathi signature wall
Marathi signature wall sakal

मायमराठीत स्वाक्षरीच्या भिंतीने वेधले सर्वांचे लक्ष

नागरिकांना प्रेरणा मिळावी, यासाठी ‘स्वाक्षरी भिंत’ उभी केली
Published on

उदगीरः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्यमय झालेल्या उदगीरच्या वातावरणात शहरातील व्यापाऱ्याने ‘मराठी स्वाक्षरी भिंत’ उभी केली आहे. या स्वाक्षरी भिंतीने अनेकाचे लक्ष वेधले.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीसमोर शहरातील व्यापारी ओमप्रकाश गर्जे यांनी आपली स्वाक्षरी मराठीत करावी, नागरिकांना प्रेरणा मिळावी, यासाठी ‘स्वाक्षरी भिंत’ उभी केली. या भिंतीवर नागरिकांनी मराठीत स्वाक्षरी करावी, असे आवाहन केले.

श्री. गर्जे यांच्या या आवाहनाला नागरिकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आपली स्वाक्षरी मराठीत करून ‘मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी’ असा स्वाभिमान व्यक्त करावा, अशी अपेक्षा या उपक्रमातून व्यक्त केली आहे. अनेक तरुणांनी या भिंतीवर मराठीत स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदविला. अनेक विद्यार्थ्यांनी मराठीत स्वाक्षरी करून आपल्या विद्यालयाचे नावही यावर लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com