Aurangabad : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३० लाख हेक्टरचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad : 30 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान

Aurangabad : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३० लाख हेक्टरचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानभरपाईसाठी सुमारे २,४०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्याचा खरीप पिकांना फटका बसला. मराठवाड्यात खरीपाच्या ४८ हजार २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटींची मदत शासनाने केली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या नुकसानीपोटी २,४०० कोटींची मागणी विभागीय प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यानुसार नुकसानीची टक्केवारी

औरंगाबाद : ६८ जालना : ६३

परभणी : ४३ हिंगोली : ६४

नांदेड : ७३ बीड : ६४

लातूर : ५५ उस्मानाबाद : ६७

सरासरी : ६३