esakal | औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : नव्या रचनेत फारसा बदल नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : नव्या रचनेत फारसा बदल नाही 

नवीन रचनेत याला ४२ क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे हा वॉर्ड सर्वसाधारण झाल्याने सर्वच पक्षांकडून अतिशय चुरस निर्माण झाली आहे. नवीन रचनेत वॉर्डाच्या हद्दीत फारसा बदल झाला नाही. यामध्ये अयोध्यानगर, एन-सातचा भाग, म्हाडा कॉलनी यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपचे प्राबल्य होते. 

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : नव्या रचनेत फारसा बदल नाही 

sakal_logo
By
शेखलाल शेख

अयोध्यानगर : वॉर्ड क्रमांक ४२ 

मागील निवडणुकीत हा वॉर्ड क्रमांक ३९ होता. आता नवीन रचनेत याला ४२ क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे हा वॉर्ड सर्वसाधारण झाल्याने सर्वच पक्षांकडून अतिशय चुरस निर्माण झाली आहे. नवीन रचनेत वॉर्डाच्या हद्दीत फारसा बदल झाला नाही. यामध्ये अयोध्यानगर, एन-सातचा भाग, म्हाडा कॉलनी यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपचे प्राबल्य होते.

हेही वाचा : ठाकरे सरकार तरी देईल का मालकी हक्‍काचे पीआर?

अशी आहे रचना 

उत्तर : अस्मिता पार्क श्री. बदर यांच्या घरापासून ओंकार किराणा दुकानापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजे संभाजी चौक ते शिवेश्‍वर महादेव मंदिरमार्गे धम्मदीप बुद्धविहार, जळगाव वळण रस्त्यापर्यंत. 
पूर्व : जळगाव रोडवरील धम्मदीप बुद्धविहारापासून जळगाव रोडमार्गे एन-सात येथील हॉटेल सनीपर्यंत डांबरी रस्ता.

हेही वाचा : बिबट्याने फाडल्या सिंदोनच्या उपसरपंचाच्या गायी

दक्षिण : एन-सात येथील हॉटेल सनीपासून गजानन कृपा बिल्डिंग व आनंदवन सोसायटी ते ओंकार गॅस एजन्सीसमोरील चौकापर्यंत. 
पश्‍चिम : ओंकार गॅस एजन्सीसमोरील चौकापासून मुख्य डांबरी रस्तामार्गे अस्मिता पार्क येथील बदर यांच्या घरापर्यंत. 

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या- ९७७३ 
अनुसूचित जाती- १५२९ 
अनुसूचित जमाती- ११५ 


वॉर्डाची रचना होते, त्यानंतर नवीन नगरसेवक येतो. त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होतो. विशेष म्हणजे वॉर्डातील गरिबांच्या कामांकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. 
- प्रल्हाद पाटील 

सात ते आठ दिवसांआड येथे पाणी येते. काही वेळा हे पाणी अशुद्ध असते. तसेच ड्रेनेजलाइन चोकअप होतात. त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. वॉर्डात रस्त्याची कामे झाली आहेत. 
- दादाराव दांडगे