औरंगाबाद महापालिका सुरु करणार शहरात पेट्रोलपंप, उत्पन्नवाढीसाठी प्रशासकांचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

636790147689428406-bp-petrol-pump-fb

औरंगाबाद  महापालिकेच्या तिजोरीत वर्षांपासून खडखडाट आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांचा वापर करण्यासाठी सात ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

औरंगाबाद महापालिका सुरु करणार शहरात पेट्रोलपंप, उत्पन्नवाढीसाठी प्रशासकांचे प्रयत्न

औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत वर्षांपासून खडखडाट आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांचा वापर करण्यासाठी सात ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. मध्यवर्ती जकात नाका परिसरातील पंपाचे काम प्रगतिपथावर असून, इतर सहा ठिकाणच्या जागा अंतिम केल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

गरज संपताच आशा स्वयंसेविकांकडे दुर्लक्ष, दोन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेने दिले नाही वेतन

महापालिकेचा मध्यवर्ती जकात नाका परिसरात जुना पंप होता. याठिकाणी फक्त महापालिकेच्या वाहनांमध्ये डिझेल भरण्याची सोय होती. मात्र, हा पंप वादात सापडल्यानंतर बंद करण्यात आला. सध्या महापालिका खासगी पेट्रोलपंचालकाकडून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल, डिझेल खरेदी करीत आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे शहरात पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्यवर्ती जकात नाका परिसरातील महापालिकेची जागा इंडियन ऑईल कंपनीला वीस वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

कंपनी स्वखर्चातून पंप उभारून महापालिकेला देणार आहे. याठिकणी कर्मचारी महापालिकेचे असतील. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणारा नफा महापालिकेला मिळणार आहे. तसेच जागेचे भाडे सुद्धा महापालिकेला मिळेल. पेट्रोल, डिझेलची खरेदी मात्र इंडियन ऑईल कंपनीकडून बंधनकारक असेल. याच धर्तीवर आणखी सहा ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मोठे उत्पन्न जमा होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६७१ कोरोनाबाधितांवर उपचार, नवे १२६ रूग्ण


इंधनावर पाच कोटीचा खर्च
डिझेल पंप बंद केल्यापासून महापालिका खासगी पंपधारकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी करते. त्यासाठी वर्षभराची निविदा काढली जाते. सेव्हनहिल उड्डाणपुलालगत असलेल्या एका पंपाकडून वर्षाला तब्बल पाच कोटी रुपयांचे डिझेल-पेट्रोल महापालिका खरेदी करते.

या सहा ठिकाणच्या जागा अंतिम
१) गरवारे स्टेडीयम
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चोक, पीसादेवी रोड
३) कांचनवाडी (महापालिका निवासस्थान)
४) हॉटेल ताज समोर (गायमुख परिसर)
५) हर्सूल नाका
६) सावंगी बायपास ( दुग्धनगरीची जागा)
७) मध्यवर्ती जकात नाका

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top