औरंगाबाद : तब्बल १२ प्रभागांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त

उमेदवारांची मोठ्या प्रभागात होणार दमछाक; दोन प्रभागांची लोकसंख्या २६ हजार
Aurangabad municipal elections population of 12 wards more than 30000
Aurangabad municipal elections population of 12 wards more than 30000sakal

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत असल्याने प्रभागांचे नकाशे व मतदारसंख्या पाहून संभाव्य उमेदवार बुचकळ्यात पडले आहेत. पडेगाव, मिटमिट्यासह तब्बल १२ प्रभागांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार हे नक्की.

सर्व ४२ प्रभागांची लोकसंख्या २६ हजार ते ३२ हजार अशी असून, गजानननगर-पुंडलिकनगर व ठाकरे नगर-सिडको एन-२,एन-३, एन-४ हे प्रभाग २६ हजार एवढ्या लोकसंख्येचे आहेत. प्रभाग रचनेचे प्रारूप व प्रभागांच्या हद्दीचे नकाशे प्रसिद्ध होताच राजकीय पक्षांसह इच्छुकांचा त्यावर खल सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले.

कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे लांबलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुरुवारी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग रचनेमुळे कोणत्या पक्षाचा फायदा होईल, कोणत्या पक्षाला फटका बसेल? याचा ताळेबंद मांडला जात आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत असल्याने एवढ्या मोठ्या प्रभागात आपला जम बसेल का? याचा अंदाज इच्छुक घेत आहेत. प्रभाग रचना करताना जुन्या वॉर्डांची फोडफोडी करण्यात आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या एकगठ्ठा मतदानावर गदा आली आहे.

प्रभागातील कोणत्या भागातून किती मतदान मिळू शकते, याचे ताळेबंद बांधण्याचे काम संभाव्य उमदेवार व राजकीय पक्षांमार्फत सुरू आहेत. तब्बल १२ प्रभाग तीसहजारी लोकसंख्येचे आहेत. त्यात हर्सूल, वानखेडेनगर, बेगमुरा, पडेगाव-मिटमिटा, जयभीमनगर-घाटी, हत्तेसिंगपुरा-किराडपुरा, एन-१ चिकलाठाणा-एमआयडीसी, अविष्कार कॉलनी-आयोध्यानगर-सिडको एन-६, संजयनगर-खासगेट, राजाबाजार-औरंगपुरा-नवाबपुरा, एकनाथनगर-कबीरनगर, ज्योतीनगर उस्मानपुरा या वॉर्डांचा समावेश आहे. या वॉर्डांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त आहे तर गजानन नगर-पुंडलिक नगर, ठाकरे नगर-सिडको एन-२, एन-३, एन-४ या प्रभागांची लोकसंख्या २६ हजार एवढी आहे.

उमेदवारांची शोधाशोध सुरू

प्रभागांचे नकाशे प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार फिट बसेल, याची चाचपणी सुरू झाली आहे. एका प्रभागातील तीनपैकी एक उमेदवार मोठा असेल, त्याची संपूर्ण प्रभागावर छाप असली पाहिजे. त्यामुळे इतर दोन उमेदवारांना मदत होईल, अशी फिल्डिंग लावण्यासाठी लोकप्रिय चेहरे पडताळून पाहिले जात आहेत. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार का? भाजप-मनसे युती होणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे अनेक वर्षे शिवसेना-भाजप युती असल्याने वर्षानुवर्षे शिवसेना लढत असलेल्या वॉर्डात भाजपकडे तर भाजप लढत असलेल्या वॉर्डात शिवसेनेकडे उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तसे फोडाफोडीचे राजकारण सुरू होईल, त्यासाठी कोण फुटू शकतो? याचाही अंदाज घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे आहेत मोठे प्रभाग, लोकसंख्या

  • हर्सूल : ३०,४३५

  • वानखेडेनगर : ३१,९८१

  • बेगमपुरा : ३०,८६७

  • पडेगाव-मिटमिटा : ३२,५६०

  • जयभीमनगर-घाटी : ३२,४९५

  • हत्तेसिंगपुरा-किराडपुरा : ३१,३८८

  • एन-१, चिकलाठाणा : ३१,२५१

    एमआयडीसी

  • आविष्कार कॉलनी, : ३०,५२३

    अयोध्यानगर एन-६

  • संजयनगर-खासगेट : ३१,२६१

  • राजाबाजार, : ३०,९९८

    औरंगपुरा, नवाबपुरा

  • एकनाथनगर, कबीरनगर : ३०,५२९

  • ज्योतीनगर उस्मानपुरा : ३०,४०६

या वॉर्डांची कमी लोकसंख्या

  • २६,५४४ गजानन नगर,

    पुंडलिक नगर

  • २६,८८१ ठाकरेनगर, सिडको

    एन-२, एन-३, एन-४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com