नाशिक महामार्गावर दरोडेखोरांनी चोरीच्या इनोव्हाने एकाला उडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक महामार्गावर दरोडेखोरांनी चोरीच्या इनोव्हाने एकाला उडवले

नाशिक महामार्गावर दरोडेखोरांनी चोरीच्या इनोव्हाने एकाला उडवले

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : नाशिक महामार्गावर तीन दरोडेखोरांनी शुक्रवारी (ता.17) रात्री पावणेअकराच्या सुमारास थरारक घटनेत औरंगाबाद नाशिक मार्गावर कसाबखेडा फाट्याजवळ चिखली बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची इनोव्हा अडवून त्यांना मारत ही गाडी पळवली. पुढे फतीयाबादजवळ चोरांनी या गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले. तो जागीच ठार झाला. तत्पूर्वी डोणगावच्या एकाला मारहाण करून त्यांची क्वीड गाडी चोरुन‌ नेल्याचेही पुढे उघडकीस आले. याच क्वीड गाडीने त्यांनी ही इनोव्हा अडवली आणि हा हल्ला केला होता.

दुचाकीला उडविताना इनोव्हाचेही नुकसान होऊन त्यातील दरोडेखोर जखमी झाले.‌ दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारार्थ औरंगाबादला दवाखान्यात दाखल केले तर मारहाण झालेल्या चिखली बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यावरही उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात सध्या दरोडेखोरांनी उच्छाद मांडला अआहे.‌ शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारंभी दरोडेखोरांनी डोणगावच्या केवल सुलानेंना जबर मारहाण करून त्यांची क्विड गाडी (एमएच 20 डिव्ही) 4245) तिघा दरोडेखोरांनी पळवली. गाडी पळवल्यानंतर नंतर ते चापानेर भागाकडे गेले. तिथून परत येत कसाबखेडा फाट्याजवळ चिखली बँकेच्या अध्यक्ष सतीश गुप्त, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे हे प्रवास करत असलेल्या इनोव्हाच्या (एम एच 20बी इन 1857) पुढे गाडी लावून त्यांना अडवले व जबर मारहाण केली. मारहाणीनंतर दरोडेखोरांनी त्यांच्याकडील क्वीड गाडी सोडून इनोव्हा घेऊन पोबारा केला.

पुढे फतीयाबादजवळ एका दुचाकीस्वारास त्यांनी उडवले. या अपघातात चंद्रकांत वसंतराव बोडखे (वय ४२, रा. खिर्डी, ता. खुलताबाद) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर हे तिघे दरोडेखोर गंभीर जखमी झाले.पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले व उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानाच्या पार्श्वभूमीवर राऊत वर्षा बंगल्यावर

योगेश राजदेव, उमेश राजदेव, देवेंद्र शिंदे अशी या दरोडेखोरांची नावे असून तिघेही गंगापूर तालुक्यातील रामराई गावातील आहेत. या तिघांपैकी एकावर उपचार असून दौलताबाद पोलिसांनी दोघांना शिल्लेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे व सहकाऱ्यांनी घटना कळताच घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात चिखली बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या इनोव्हा गाडीत बंदूक व काडतुसे होती.अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत असलेली ही बंदूक व काडतुसे पोलिसांनी मिळवली आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी असलेले चिखली बँकेच्या अध्यक्ष सतीश गुप्त, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिखली बँकेचे लासूर स्टेशन शाखेचे व्यवस्थापक व कर्मचारीही घटनास्थळी पोचले आहेत.

हेही वाचा: 'मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीय'; पंजाब काँग्रेसमध्ये उडणार भडका

या दरोडेखोरांनी हल्ल्यात पहिल्यांदा पळवून नेलेली क्वीड गाडी इनोव्हा पळवताना तिथेच सोडली.ती क्वीड सुस्थितीत आहे पण पळवलेली इनोव्हा गाडी भरधावपणे चालवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातात दुचाकी व इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. इनोव्हाचा समोरील भाग पूर्णपणे चेपला असून इंजिन जवळपास नष्टच झाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad Newsaccident
loading image
go to top