esakal | मराठवाड्यात ११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, साडेआठ हजार नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्यात ११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, साडेआठ हजार नवीन रुग्ण

मराठवाड्यात ११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, साडेआठ हजार नवीन रुग्ण

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता.१४) उपचारादरम्यान ११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २८, औरंगाबाद २७, परभणी २०, उस्मानाबाद १४, जालना-लातूरमध्ये प्रत्येकी आठ, बीड सात, हिंगोलीतील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात आठ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेले रुग्ण असे ः लातूर १७६१, औरंगाबाद १७१८, नांदेड १४३९, परभणी ११७२, बीड ९२८, जालना ७०१, उस्मानाबाद ६१३, हिंगोली १३६.

घाटी रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात जवाहर कॉलनीतील ४६ वर्षीय महिला, वैजापुरातील ५२ वर्षीय पुरुष, सिडकोतील ६० वर्षीय पुरुष, सोयगावातील ४५ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, नवजीवन कॉलनीतील ४५ वर्षीय महिला, जयसिंगपुऱ्यातील ७६ वर्षीय महिला, पैठणमधील ५२ वर्षीय पुरुष, मोतीकारंजा येथीर ५३ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ६७ वर्षीय महिला, कन्नडमधील ३५ वर्षीय महिला, पाणचक्की भागातील ४५ वर्षीय पुरुष, कन्नडमधील ६५ वर्षीय पुरुष, सोन्नापूर पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुऱ्यातील ६७ वर्षीय महिला, वैजापुरातील ५५ वर्षीय महिला, अंभई-सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष, जवाहर कॉलनीतील ६६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. लिंबगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, शिवशंकर कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलेनगर हर्सूल येथील ६० वर्षीय महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर गेवराई गुंगी-फुलंब्री येथील ७७ वर्षीय महिला, स्टेशन परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ७० वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनी येथील ८४ वर्षीय पुरुष, सिडको एन पाच येथील ९३ वर्षीय पुरुष आणि शिवशंकर कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी १२३९ रुग्ण बरे

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ७१८ रुग्णांची भर पडली. बरे झालेल्या आणखी १ हजार २३९ जणांना सुटी देण्यात आली. रुग्णसंख्या १ लख ३ हजार २५४ वर पोचली आहे. आतापर्यंत ८५ हजार ४०० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज २७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत २ हजार ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.