Aurangabad News | पैठण तालुका राहणार पाणी टंचाईमुक्तच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण तालुका राहणार पाणी टंचाईमुक्तच!

औरंगाबाद : पैठण तालुका राहणार पाणी टंचाईमुक्तच!

पैठण : मागील दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या पैठण तालुक्यातील नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात तिसऱ्यांदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. मुबलक पाणी साठ्यामुळे हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्याचा 'या' राज्यांना अलर्ट

यंदा जायकवाडी धरणासह तालुक्यातील बहुतांश मध्यम प्रकल्पामध्ये अधिकचा जलसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली असून, सध्या तालुक्यात एकाही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख राजेश कांबळे यांनी दिली. औरंगाबाद जिह्यात पैठण तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठे क्षेत्र असणारा तालुका म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा: नागपूर ग्रामीण भागात कोरोना बळींच्या संख्येत वाढ

तालुक्यात जायकवाडी धरण व खेर्डा या प्रमुख प्रकल्पांसह छोट्या- मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी झालेल्या भरमसाट पावसामुळे प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा १५ ते २० टक्क्यांनी अधिक असल्याने यंदा रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न तर निकाली लागलाच आहे. सोबतच उन्हाळ्यात बसणाऱ्या पाणी टंचाईच्या चटक्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही बाब पैठण तालुक्यातील नागरिकांसाठी दोन वर्षांपासून आनंदाची ठरत आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पैठण तालुक्यातील लाभक्षेत्रात पाणी सोडण्यात येत आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात हरभरा, गहू, भुईमुगासारख्या पिकांचा समावेश आहे. सध्या शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. विजेचा खोळंबा सोडला तर पैठण तालुक्यात पाण्यावाचून पिके राहत नसल्याचे चित्र आहे. केवळ विजेचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Aurangabad Paithan Taluka Will Remain Water Scarcity Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..