अमरनाथ यात्रेतील औरंगाबादचे भाविक सुखरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad people safe Amarnath Yatra

अमरनाथ यात्रेतील औरंगाबादचे भाविक सुखरूप

औरंगाबाद - अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटीची घटना झाली. दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी औरंगाबादमधून गेलेले सर्व भाविक सुरक्षित आहेत. सर्व भाविक शुक्रवारी रात्री सुखरूप कटरा येथे पोचले आहेत. शनिवारी या सर्व भाविकांनी माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले असल्याची माहिती या जत्थ्याचे नेतृत्व करणारे ताराचंद कहाटे यांनी दिली.

जिल्ह्यातून वर्ष १९९९ पासून भाविक मोठ्या प्रमाणावर ताराचंद कहाटे यांच्या नेतृत्वात अमरनाथला जात असतात. यंदाही औरंगाबादसह गंगापूर, वैजापूर तालुक्यातील भाविकांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी गेला आहे. त्यात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. शुक्रवारी जम्मू-काश्‍मीरमध्ये अमरनाथ गुहेच्याजवळ सायंकाळच्या सुमारास ढगफुटी झाली. या घटनेनंतर औरंगाबाद येथील भाविकांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या अनुषंगाने या जत्थ्याचे नेतृत्व करणारे ताराचंद कहाटे यांच्याशी संपर्क साधला.

‘सकाळ’ ला माहिती देताना ते म्हणाले, ‘‘घटनेच्या दिवशी आम्ही अमरनाथ दर्शन करून सकाळीच तेथून निघालो होतो. औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर परिसरातील १७० भाविक आहोत. ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्यापूर्वीच सकाळी आठ वाजता आम्ही बालताल इथून श्रीनगर मार्गे रात्री कटरा येथे सुखरूप पोचला होतो. शनिवारी परतीच्या प्रवासात वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवखोरी आदी ठिकाणांचे दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अणदूरचे १५ जण सुखरूप

उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर (ता. तुळजापूर) येथील १५ भाविक सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जालन्यातील ५२ जण श्रीनगरमध्ये

जालना जिल्ह्यातील ५२ भाविकही सुखरूप आहेत. सध्या ते श्रीनगरमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिले.

परभणीतील एक जत्था परतला

परभणीतील भाविकांचा एक जत्था जिल्ह्यात परतला. इतर भाविक सुखरूप असल्याची माहिती आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात जेही भाविक यात्रेला गेले आहेत त्यांच्या नातलगांनी त्यांचे नाव, संपर्क क्रमांक आणि गाव ९४०५४०८९३९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर टाकावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Aurangabad People Safe Heavy Rain Amarnath Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top