प्लॅस्टिक कॉइनचा जुगाऱ्यांचा जुगाड
३० जणांना घेतले ताब्यात, सिटी चौक पोलिसांची कारवाई
औरंगपुरा, ता. ३१ ः प्लॅस्टिक कॉइनचा वापर करून औरंगपुऱ्यातील पोलिस चौकीसमोर सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगारावर सिटी चौक पोलिसांनी कारवाई केली. रविवारी (ता.३०) रात्री छापा टाकून जुगार खेळणारे १९, कॅरम खेळणारे सहा आणि व्यवस्थापन व साहित्य पुरविणारे पाच, अशा ३० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल, पत्ते, प्लॅस्टिक कॉइन, कॅल्क्युलेटर व रजिस्टर असा ३ लाख १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस निरीक्षक नीतू तायडे यांना मिळालेल्या माहितीवरून रात्री ७ः२० वाजता छापा टाकण्यात आला. तीन टेबलांवर प्लॅस्टिक कॉइन व पैसे लावून १९ जण जुगार खेळताना आढळले. जागामालक विष्णू लेखराज तनवाणी यांच्या मालकीच्या इमारतीत हा प्रकार सुरू होता. तसेच त्यांनी जुगारासाठी परवाना नसल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. जुगाऱ्यांकडून ५००, १०००, २०००, एसडी १, एसडी २, अशी चिन्हे असलेले विविध रंगांचे कॉइन मिळाले. गणेश अशोक नवाते, कलीम सलीम पठाण आणि विजय रमेश जडिये हे जुगाराचे साहित्य वाटताना आढळले.
ताब्यात घेतले चालक, मालक आणि जुगारी
उपनिरीक्षक संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून विष्णू लेखराज तनवाणी, प्रकाश बाबूलाल चौधरी, महेश सोमीनाथ निकम, अजहर अन्वर मिर्झा, प्रकाश धनराज नैयनाव, सुनील पापाराव मुसळे, रिझवान खालेद शेख, विजय कांतीलाल सूर्यवंशी, चंदर सांडूजी सलामपुरे, शेख रफिक अब्दुल गणी, राजेश दामोधर गरुड, गौतम देवराव हिवराळे, प्रकाश पांडुरंग रिंढे, सय्यद अजिज सय्यद हबिब, शेख शपीक शेख ईसा, अशरद खान आजम खान, शेख नजीर शेख कबीर, जयंत नारायन गुप्ता, किरीट दामोधरदास सोनी, प्रकाश विनायकराव दंख, किशोर सूरज जैन, शेख इब्राहिम शेख साहेब मिहा, विशाल सुरेश लाचुरीया, राजेश श्रावण वानखेडे, अक्रम सलीम कुरेशी, शेख रफिक शेख बदरउद्दीन, गोलू राधेशाम वर्मा, गणेश अशोक नवाते, कलीम सलीम पठाण आणि विजय रमेश जडिये यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करीत आहेत.