औरंगाबाद : नशेच्या गोळ्या मेडिकलमधून विकल्यास कारवाई; डॉ.गुप्ता

आयुक्तालयात विशेष अमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना
Aurangabad Police Commissioner Action on drug pills sale medical shop
Aurangabad Police Commissioner Action on drug pills sale medical shop sakal

औरंगाबाद : नशेखोरीमुळे शहरात गुन्हेगारी वाढीस लागून सर्वात जास्त खून नशेखोरीतून झाल्याचे पोलिस आयुक्तांच्या वार्षिक अहवालात स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातही मे महिन्यात बटन या नशेच्या औषधीच्या आहारी जाऊन दोन खुनाच्या घटना घडल्या. नशेखोरीच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) नियुक्त करण्यात आले असून तपासाअंती शहरातील मेडीकल स्टोअर्स किंवा संबंधित मेडीकल एजन्सीकडून सदर नशेच्या गोळ्यांची विक्री झाल्याचे पथकासह संबंधित पोलिस ठाण्यांच्या पोलिसांच्या नजरेस आल्यास बंदीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

नशेच्या गोळ्याबाबत विशेष समितीही तयार करण्यात आलेली आहे. या समितीत पोलिस आयुक्तासह अन्न व औषधी विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह सिव्हिल सर्जन यांचीही तयार करण्यात आलेली आहे. या समितीत पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या कारवाईचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यानंतर तपासात एखाद्या मेडिकल दुकानावरून किंवा एखाद्या एजन्सीने विना प्रिस्क्रिप्शन नशेच्या औषधींची विक्री केल्याची माहिती समोर आल्यास, अशा विक्रेत्यांना सह आरोपी करून, त्यांचे औषधी विक्रीचे परवाने रद्द करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही केली जाणार आहे. अशा मेडीकल स्टोअर्सचे लायसन्स थेट रद्द करण्यात येतील.

अन्न व औषधी विभागाच्या विशेष मोहिमेसाठी पोलिस देणार

सध्या अन्न व औषधी विभागाकडे कर्मचारी नसल्याबाबत सांगण्यात आले असल्याने शहरातील स्टॉकिस्ट, होलसेल विक्रेते, तसेच मेडीकल स्टोअर्स याच्या रेकॉर्डच्या तपासणीसाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस बंदोबस्त देण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी दिली.

काय करते पथक

शहर पोलिस आयुक्तालयात विशेष अमली पदार्थ विरोधी पथक तयार करण्यात आलेले आहे. गुन्हे शाखेच्या अंतर्गत एनडीपीएस पथकाला फक्त बटन, सीरप आणि नशेच्या पदार्थांची तस्करी, तसेच विक्री रोखण्यासाठी विशेष कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. हे पथक केवळ फक्त अमली पदार्थ विरोधी पथक म्हणून कार्यरत असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com