औरंगाबाद : खुनांच्या दोन घटनांनी औरंगाबाद हादरले

हिमायत बाग परिसरात तरुणाला पेटविले
Aurangabad police Himayat Bagh area Two murder fire case
Aurangabad police Himayat Bagh area Two murder fire caseesakal

औरंगाबाद : वार शनिवार. वेळ मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांची. पोलिस दलाच्या ११२ या क्रमांकावर फोन वाजला अन् पलीकडून आलेल्या ‘एका व्यक्तीला पेटविण्यात आले असून व्यक्ती पुरुष आहे की महिला माहीत नाही पण ती व्यक्ती तडफडत आहे. तत्काळ रुग्णवाहिकेसह मदत पाठवा’ या फोन कॉलने मध्यरात्री पोलिस दल हादरले. घटनास्थळ गाठल्यानंतर अंदाजे ३० ते ३४ वर्षे वयाच्या एका तरुणाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह जळताना दिसल्याने पोलिसही अवाक् झाले. हा प्रकार हिमायत बाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी घडला. याप्रकरणी मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम रविवारी दिवसभर सुरु होते.

बेगमपुरा पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फोन कॉल हा सदर डोंगराच्या जवळच असलेल्या एका फार्म हाऊसवर कामाला असलेल्या आकाश बनकर या नोकराचा होता. त्याला डोंगराजवळ १ वाजून २५ मिनिटांनी मोठी आग दिसली. त्याने आगीकडे धाव घेतली असता त्याला एका व्यक्तीला पेटवून देण्यात आल्याचे दिसले. त्याने ११२ या मोफत क्रमांकावर संपर्क केला असता, गस्तीवर असलेले अंमलदार गणेश गायकवाड, श्रीकांत राठोड यांच्याशी बोलणे झाले. मात्र घटनास्थळ हे फोनवर सांगून न पोहोचण्यासारखे असल्याने आकाश याने हिमायत बाग परिसरातील भाऊ उद्धवराव पाटील चौक गाठला.

यानंतर पोलिसांना घेऊन तो घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जळत्या मृतदेहावर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. दरम्यान बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठले. तसेच उपायुक्त उज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, सायबर निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, विशाल बोडखे आदी अधिकारी तिथे पोचले. नोकर बनकर हा सव्वा एक वाजेदरम्यान लघूशंकेसाठी उठल्यानंतर त्याला आग दिसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर मध्यरात्रीच तपासाला सुरवात केली. प्रथमदर्शनी मृतदेह आणलेल्या रस्त्याची पाहणी केली असता, पोलिसांना दोनशे मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत रस्त्यावर रक्त सांडल्याचे दिसून आले. तसेच जळाल्याने ओळखणे कठीण असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंमलदार गणेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्ह्याची नोंद बेगमपुरा पोलिसांत करण्यात आली आहे. औरंगाबाद : वार शनिवार. वेळ मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांची. पोलिस दलाच्या ११२ या क्रमांकावर फोन वाजला अन् पलीकडून आलेल्या ‘एका व्यक्तीला पेटविण्यात आले असून व्यक्ती पुरुष आहे की महिला माहीत नाही पण ती व्यक्ती तडफडत आहे. तत्काळ रुग्णवाहिकेसह मदत पाठवा’ या फोन कॉलने मध्यरात्री पोलिस दल हादरले. घटनास्थळ गाठल्यानंतर अंदाजे ३० ते ३४ वर्षे वयाच्या एका तरुणाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह जळताना दिसल्याने पोलिसही अवाक् झाले. हा प्रकार हिमायत बाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी घडला. याप्रकरणी मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम रविवारी दिवसभर सुरु होते.

बेगमपुरा पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फोन कॉल हा सदर डोंगराच्या जवळच असलेल्या एका फार्म हाऊसवर कामाला असलेल्या आकाश बनकर या नोकराचा होता. त्याला डोंगराजवळ १ वाजून २५ मिनिटांनी मोठी आग दिसली. त्याने आगीकडे धाव घेतली असता त्याला एका व्यक्तीला पेटवून देण्यात आल्याचे दिसले. त्याने ११२ या मोफत क्रमांकावर संपर्क केला असता, गस्तीवर असलेले अंमलदार गणेश गायकवाड, श्रीकांत राठोड यांच्याशी बोलणे झाले. मात्र घटनास्थळ हे फोनवर सांगून न पोहोचण्यासारखे असल्याने आकाश याने हिमायत बाग परिसरातील भाऊ उद्धवराव पाटील चौक गाठला.

यानंतर पोलिसांना घेऊन तो घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जळत्या मृतदेहावर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. दरम्यान बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठले. तसेच उपायुक्त उज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, सायबर निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, विशाल बोडखे आदी अधिकारी तिथे पोचले. नोकर बनकर हा सव्वा एक वाजेदरम्यान लघूशंकेसाठी उठल्यानंतर त्याला आग दिसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर मध्यरात्रीच तपासाला सुरवात केली. प्रथमदर्शनी मृतदेह आणलेल्या रस्त्याची पाहणी केली असता, पोलिसांना दोनशे मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत रस्त्यावर रक्त सांडल्याचे दिसून आले. तसेच जळाल्याने ओळखणे कठीण असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंमलदार गणेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्ह्याची नोंद बेगमपुरा पोलिसांत करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसते दुचाकी पण..

येथील एका फार्म हाऊसवरी सीसीटीव्हीत एक ॲक्टिव्हा दुचाकी मध्यरात्री कैद झाली आहे. मात्र, दुचाकीचा अर्धा भागच दिसत आहे. दुचाकीच्या समोरच्या जागेत पोते (गोणी) दिसून येत आहे. मृतदेहाच्या ठिकाणी प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये मृतदेह टाकून त्यावर पांढऱ्या रंगाची गोणी होती. त्यावरुन पोते असे अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. मारेकऱ्याने डोंगराच्या पाठीमागील भागातून मृतदेह आणला होता. फार्म हाऊसच्या समोरच्या भागातून दुचाकी गेलेली नाही. पोलिसांनी भागातील इतर सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.

दिवसभर ओळख पटविण्याचे सुरु होते प्रयत्न

मृतदेह अर्धवट जळाल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षकांसह ठाण्यातील इतर अधिकारी आणि गुन्हे शाखेचे विविध पथकही ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एक तडीपार गुंड असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तो गुंड जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com