
हंगामी मात्र ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली लग्न सराई आता पूर्वीसारखी धुमधडाक्यात सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे
ग्रामीण भागात लग्नसराई धुमधडाक्यात! मंडप, बँडबाजा, आचारी, मंगल कार्यालयं बुक
आडुळ (औरंगाबाद): मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवसाय बंद होते. शिवाय सण, उत्सव, धर्म स्थळे, लग्न समारंभे ही शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णत: कोलमडली होती. पण आता देशासह राज्यात ऑनलॉकचे टप्पे सुरु झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे.
मे महिन्यांपर्यंत बूकींग-
हंगामी मात्र ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली लग्न सराई आता पूर्वीसारखी धुमधडाक्यात सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. मागच्या वर्षी घरीच बसून असलेले मंडप डेकोरेटर, फोटो ग्राफर, आचारी, डिजे, बॅंडवाले, मंगल कार्यालये मे महिन्यापर्यंत बुक झाली आहेत. तर किराणा, फर्निचर, कापड दुकाने, सराफा यांच्या धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामीण बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्याचे चिञ दिसुन येत आहे.
'बर्ड फ्लू'ची भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात खाल्लं चिकन
मागच्या वर्षी आमच्या हाताला काम नव्हते. त्यात आचारी काम करणारया कारागिरांनी शासनाने कोरोनाकाळात कोणत्याही प्रकारची अर्थिक मदत केली नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. माञ आता व्यवसाय सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे - पाशु पठाण ( आचारी, आडुळ)
ग्रामीण भागातील रेलचेल वाढली-
विशेष म्हणजे लग्न समारंभ धुमधडाच्या सुरु झाल्याने या हंगामी व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक छोटे व्यवसायिक, कारागीर, मजूर यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोरोना काळात अनेक वधु-वर पित्यांनी मोसजक्याच नातेवाईक मंडळीच्या उपस्थितीत लग्नं उरकुन दिली होती. तर अनेकांनी लग्ने पुढे ढकलून पुढच्या वर्षी करु असं ठरविल्याने मागच्या वर्षीची थांबलेली लग्नं व यंदा होणारी लग्नं यामुळे ग्रामीण भागात रेलचेल वाढली आहे.
शहराला मिळाले नवीन २३ चार्टर्ड अकाउंटंट; अनिरुद्ध ठोंबरे, पराग सोमाणी प्रथम
लॉकडाउनच्या काळात लग्न कार्य मंद असल्याने आम्ही मागच्या वर्षी घरीच बसुन होतो. माञ आता अनलॉक सुरु झाल्याने आमच्या मंडपची मागणी वाढली असून मे महिन्यापर्यंतच्या तिथी बुक झाल्या आहे- शांतीलाल राठोड (दिनेश मंडप, अब्दुल्लापुर)
(edited by- pramod sarawale)
Web Title: Aurangabad Positive News Weddings Rural Areas Mandap Bandbaja
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..