औरंगाबाद : वादळी वाऱ्यासह जालन्यात हलका पाऊस

राज्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस
Aurangabad Pre monsoon Light rain in Jalna
Aurangabad Pre monsoon Light rain in Jalnasakal

औरंगाबाद : राज्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस होत असताना औरंगाबाद-जालन्यात भाजून काढणाऱ्या उन्हाचा कडाका आणि असह्य उकाडा कायम आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही ठिकाणच्या काही भागांत सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि काहीकाळ तुरळक, हलका पाऊस झाला. मराठवाड्याच्या बहुतांश भागात यापूर्वी मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला आहे आणि अधूनमधून होत आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्हे तापलेलेच आहेत. चिकलठाणा वेधशाळेत आज झालेल्या नोंदीनुसार औरंगाबादचे तापमान ४१.२ अंश सेल्सिअस होते.

दिवसभर रणरणते ऊन आणि सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडकोसह, आकाशवाणी, रेल्वेस्टेशन आदी भागात तुरळक पाऊस झाला वारे सुटले. त्यामुळे काही प्रमाणात उकडा कमी झाला पण नंतर पुन्हा वाढला. दरम्यान, जालना शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. मंठा तालुक्यात ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

परभणीचा पारा ४२.७ अंशांवर

परभणी : पावसाळा जवळ आला असला तरी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळानुसार आज परभणी शहराचे कमाल तापमान ४२.७ तर हिंगोली ४२.१ अंश सेल्सिअस होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा अधिक जाणवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com