Aurangabad Sabha: राज ठाकरे यांच्या सभेला 'राज्यभरातून' येणार कार्यकर्ते

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जय्यत तयारी
Raj Thackeray sabha
Raj Thackeray sabhasakal

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मेरोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मराठवाडा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते येण्याचे नियोजन केले जात आहे. इतकेच नव्हे, तर थेट अयोध्येतून राज समर्थक येणार असल्याचा दावा केला जात आहे. गुरुवार पासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेसाठी तयारी केली जात आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस सुनिल धोत्रे हे औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. त्यांनी सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. तसेच सभेसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन परवानगी मागीतली. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वॉर्डा वॉर्डात फिरुन निमंत्रण दिलेले आहे. गुरुवारपासून मनसेकडून सभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेकडून सभेसाठी खुर्च्या, चटई तसेच विद्युत व्यवस्था उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि पुरुष, व्हीआयपी अशा सर्वांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com