औरंगाबाद : रस्तारोको कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही निदर्शने
स्तारोको कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
स्तारोको कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात sakal

औरंगाबाद : केंद्र सरकारने कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन शेतकरी विरोधी तीन काळे कायदे बनवले आहेत. ते काळे कायदे रद्द व्हावेत आणि एमएसपी हा नवा कायदा तयार करण्यात यावा यासाठी सोमवारी (ता.२७ ) क्रांती चौक येथे सरकार विरोधात रस्ता रोको करून निदर्शने करण्यात आली.यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही हमाल, कष्टकऱ्यांच्यावतीने निदर्शने करण्यात आले.

स्तारोको कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुढे ढकललेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या निर्णयानुसार सोमवारी (ता.२७)शहरातील क्रांतीचौकात कामगार संघटना संयुक्त कृती समिती, शहरातील डाव्या व पुरोगामी लोकशाहीवादी पक्ष संघटना व जनआंदोलन संघर्ष समिती च्यावतीने रस्ता रोको आंदोलन करून निदर्शने करण्यात आले. देशभर पसरत चाललेल्या या शेतकरी आंदोलनाने ग्रामीण कष्टकरी, शहरी बेरोजगार या शिवाय आदिवासी स्त्रीया व विद्यार्थ्यांना संघटीत होण्याची हाक दिली आहे. हे शेतकरी आंदोलन आता केवळ शेतकऱ्यापुरते मर्यादित राहिले नसून ते देशातील तमाम कामगार, कष्टकरी व शोषित पिडीत जनतेचे आंदोलन बनले असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात अॅड. भगवान भोजने, भिमराव बनसोड , बुद्धिनाथ बराळ , अशफाक सलामी , भास्कर लहाने , चंद्रकांत चव्हाण , लक्ष्मण साक्रुडकर, प्रा. राम बाहेती, अॅड. अभय टाकसाळ, प्रकाश बनसोड आदी सहभागी झाले होते.

हमाल कष्टकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

भारत बंद निमित्त हमाल कष्टकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. यावेळी तीन जुलमी कृषी कायद्यामुळे ९० टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमीनी बड्या उद्योगपतींच्या घशात जाणार असून,९० कोटी जनतेची अन्न सुरक्षा धाब्यावर बसविली जाणार असल्याने तीन ही कृषि कायदे रद्द करावेत अशी मागणी आंदोलकासमोर बोलताना महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व स्वराज इंडियाचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी केली. उपजिल्हधिकारी श्री. मुळे यांच्याकडे केंद्र व राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. यांचवेळी कामगार उपायुक्त व उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीपुढेही निदर्शने करून माथाडी कामगारांचे कायदेशीर प्रश्न मार्गी लावावेत याचा पुनःरूच्चार केला. कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत आणि बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आली. आंदोलनात स्वराज इंडियाचे अण्णासाहेब खंदारे, मराठवाडा लेबर युनियनचे छगन गवळी, प्रविण सरकटे, अरविंद बोरकर, जगन भोजने, भारत गायकवाड, देविदास कीर्तिशाही आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com