Aurangabad : पक्का रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : पक्का रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय

नाचनवेल : शाहूटाकळी (ता.कन्नड) येथील धनगर वस्तीवरील शेतकऱ्यांना पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून याशिवाय गावाला जोडणारा कमी उंचीचा पूल असल्याने अडचणीत भर पडली. वरिष्ठांनी दखल घेऊन रस्त्याचे काम हाती घ्यावे तसेच पूल बांधावा अशी मागणी होत आहे.

अनेक वर्षापासून मोहरा ते टाकळी शाहू (धनगर वस्ती) रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्ता आणि नदी वरील पुलाचे काम झाले नाही. अंजना पळशी प्रकल्प मागील तीन-चार वर्षापासून सतत पूर्णपणे भरत असून त्यामुळे दरवर्षी अंजना नदीला पूर असतो. यामुळे मोहरा, नाचनवेलकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे धनगर वस्तीवरील शेतकऱ्याचा संपर्क तुटल्या त्यांना लांबच्या मार्गाने ये-जा करावी लागते.

तसेच गावात रस्ता जाण्यासाठी नदीवर कमी उंचीचा पूल असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ये-जा करायची कशी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत विद्यमान आमदाराकडे पुलाची मागणी करण्यात आली आहे. रस्ता व पुलाचे तत्काळ काम पूर्ण करण्याची मागणी रामदास ढेपले, आजिनाथ सावळे, मारोती सावळे, सर्जेराव ढेपले, नेमिणाथ ढेपले, संतोष साबळे, शांताराम शेळके, महादू सावळे, पशुसेवक पल्हाल, ठकाजी सावळे, रामदास जाधव, गोविंद शेळके, अक्षय ढेपलेसह शेतकऱ्यांनी केली आहे.