औरंगाबाद : मदतीच्या रकमेकडे शेतकऱ्यांचे डोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Farmers crop damage compensation

Aurangabad : मदतीच्या रकमेकडे शेतकऱ्यांचे डोळे

सिल्लोड : नैसर्गिक आपत्तीच्या उद्भवलेल्या परिस्थितीनंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निधीकडे मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. विशेष म्हणजे तालुक्यात जून २०२२ पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत घटनांतील नुकसानीपोटी मदत मिळाली. मात्र, गतर्षीचा निधी देण्यास शासनाने काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षीच्या घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्यांची ३२ जनावरे दगावली आहे. ज्याची रक्कम शासनाच्या नियमानुसार ४ लाख १२ हजार रुपये होती. तसेच चार पडलेल्या घरांना पूर्ण रक्कम ३ लाख ८० हजार व १५० घरांना अंशतः मदतीची रक्कम ९ लाख अशी एकूण १७ लाख रुपयांच्या रकमेची अद्यापही प्रतिक्षा आहे.

निसर्गाच्या प्रकोपानंतर शेतकऱ्यांना उभारी देताना तातडीने शासनस्तरावरून मदत मिळणे अपेक्षित आहे. परंतु असे असताना मागील दोन महिन्यांत घडलेल्या चार जनावरे दगावलेल्या घटनांची नैसर्गिक आपत्तीमधील रक्कम देण्यात आली. परंतु मागील वर्षभरापासून नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे शासन मदतीकडे लागले आहे.

‘त्या’ रकमेची मात्र प्रतिक्षाच

जून २०२२ पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत घटनांतील मयत झालेल्या ४ जनावरांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत निधीची रक्कम १ लाख २० हजार रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. परंतु मागील वर्षभरात अतिवृष्टीने पडझड झालेली घरे, वीज कोसळून, पुरात वाहून गेलेल्या जनावरांच्या नुकसानीची रक्कम मात्र, शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.

Web Title: Aurangabad Sillod Natural Calamity Farmers Crop Damage Compensation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..