esakal | Aurangabad : वादळाने उडविला थरकाप!
sakal

बोलून बातमी शोधा

rain

Aurangabad : वादळाने उडविला थरकाप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (ता. सहा) पुन्हा एकदा वादळी वारे, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्ध्या तासात या पावसाने अनेक भागात दाणादाण उडाली. रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगर, राजीवनगर, सादातनगर, राहुलनगर भागात घरांवरील पत्रे उडाली. जिल्हा न्यायालय इमारत, बाबा पेट्रोलपंप, नगरनाका ते एएस क्लब, नाथव्हॅली दरम्यान शेकडो झाडे पडली. वीज, पथदिव्यांचे खांब, मोठ-मोठे होर्डिंग जमीनदोस्त झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळित झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे मदतकार्य सुरू होते.

शहर परिसरात वारंवार ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. गेल्या महिन्यात दहा, २८ तारखेला त्यानंतर एक ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी पुन्हा एकदा फटका दिला. या पावसात प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसात बाबा पेट्रोलपंप ते एएस क्लब व रोपळेकर चौक ते नाथव्हॅली दरम्यान वादळाचे केंद्र असल्याने शेकडो झाडे उन्मळून पडली. जालानगर येथील उद्यानातील आठ झाडे पडली. त्यामुळे एका कारचे नुकसान झाले. राजीवनगरमधील शंभर ते दीडशे घरांवरील पत्रे उडाली. सादातनगर, राहुलनगरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या पावसाची सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२.८ मिलिमिटर एवढी चिकलठाणा येथील वेधशाळेत नोंद झाली होती.

हेही वाचा: मराठवाड्यासाठी पॅकेज जाहीर करा,भागवत कराडांची राज्याकडे मागणी

पावसाची आठवडाभर रिपरीप

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरासह परिसरात आठवड्याभर पावसाची रिपरीप सुरू राहणार आहे. आठ व नऊ ऑक्टोबरला शहरात दमदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  1. होर्डिंग कोसळले, झाडे पडली

  2. विजांचा कडकडाट अन् पाऊस

  3. शेकडो घरांवरील पत्रे उडाली

  4. वीज, पथदिव्याचे खांब जमीनदोस्त

loading image
go to top