औरंगाबाद : भावी शिक्षकांसाठी आज टीईटी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 TET exam

औरंगाबाद : भावी शिक्षकांसाठी आज टीईटी परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१ (टीईटी) रविवारी (ता.२१) सकाळी १० ते दुपारी एक आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होणार आहे. या दोन्ही पेपरसाठी जिल्ह्यातील एकूण १६ हजार २३६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्रावर १४४ अन्वये मनाई आदेश शंभर मीटर परिसरात जारी केले आहेत.

परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी निरंतर असे एकूण चार भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेच्या किमान एक तास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र व ओळखपत्र आणणे आवश्यक असल्याचे परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती तथा सदस्य सचिव शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी कळविले आहे.

परीक्षासंदर्भात महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे

  • तापमान तपासणी

  • मास्कचा वापर, अंतर बंधनकारक

  • केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था

  • मोबाईल, झेरॉक्स, फॅक्स, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपकांना मनाई

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

परीक्षेसाठी केंद्र व विद्यार्थी संख्या

  • परीक्षा केंद्र - ५४ भरारी पथक- ४

  • पेपर-१ परीक्षार्थी - १३ हजार १९९ (केंद्र ४३)

  • पेपर - २ परीक्षार्थी - ९ हजार ७०५ (केंद्र ३१)

टीईटी वेळापत्रक

  • ता.२१ ः सकाळी १०.३० ते १ः शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १

  • दुपारी २ ते ४.३० ः शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २

loading image
go to top