esakal | अजूनही संपलेली नाही दुसरी लाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

Aurangabad : अजूनही संपलेली नाही दुसरी लाट!

sakal_logo
By
मनोज साखरे -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वेगवेगळ्या भागात कोरोनाचे कमी-अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा मोठा संसर्ग तूर्तास ओसरला तरीही दुसरी लाट अजून संपलेली नाही. त्यामुळे तिसरी लाट आलेलीच नाही. याबाबतची माहिती गत दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.

देशातील पहिल्या पंधरा कोरोना संसर्ग प्रभावित राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून त्यामुळे दुसरी लाट अजून महाराष्ट्रातही ओसरलेली नाही. औरंगाबादलगतच्या नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून मंगळवारी (ता. पाच) ४१३ रुग्ण बाधित आढळले तर सोमवारी ३६७ रुग्ण बाधित आढळले होते. आठ दिवसांपूर्वी ७०० ते ८०० रुग्ण बाधित आढळत होते. त्यामुळे तेथील ६३ गावांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. दररोज बाधित होणाऱ्यांचे प्रमाण तेथे खूपच अधिक असून त्यामुळे दुसरी लाट अजूनही पूर्णतः ओसरलेली नाही. नगरमध्ये वाढते रुग्ण ही लगतच असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यासाठीही धोक्याची घंटा आहे. त्या धर्तीवर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक पावले उचलण्याची गरज आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्यात अखेर शाळेची घंटा वाजली; पाहा व्हिडिओ

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग अजूनही मंदावलेला

शहरी भागात प्रती दिवस सरासरी ५ हजार ४४५ व ग्रामीण भागात १० हजार ८६५ नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र हा वेग मंदावलेला आहे. शहरात दिवसाला १५ हजार व ग्रामीण भागात २५ ते ३० हजार जणांना प्रतिदिवस लस दिली जावी. वेगाने लसीकरणाचा फायदा तिसरी लाट रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

अजूनही दुसरी लाट सुरू आहे. ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शेजारी नगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लोकांनी नियम पाळावेत. लसीकरणही करून घ्यावे.

-डॉ. प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

loading image
go to top