
छत्रपती संभाजीनगर : मॉन्सूनला प्रारंभ होऊन तीन दिवस झाले; मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाला अद्याप सुरवात झालेली नाही. तथापि, पुढील चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यात मंगळवारी सकाळी सव्वादहापर्यंत गेल्या २४ तासांत नांदेड जिल्ह्याच्या नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यात १०.२ मिलिमीटर; तर दहा जूनपर्यंत २६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.