औरंगाबाद : वडगाव-बजाजनगरात शिंदे गटाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vadgaon Bajajnagar gram panchayat election

औरंगाबाद : वडगाव-बजाजनगरात शिंदे गटाची बाजी

वाळूजमहानगर : वाळूज परिसरातील वडगाव (को.) - बजाजनगर ग्रामपंचायतीवर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलने १७ पैकी सर्वाधिक ११ जागा जिंकून बाजी मारली. तर शिवसेनेच्या निष्ठावंत पॅनलला ४ व भाजपच्या परिवर्तन पॅनलला केवळ २ जागा मिळाल्या. अपक्षांसह माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला. दरम्यान, जिल्ह्यात शिंदे गटाकडे आलेली ही पहिलीच मोठी ग्रामपंचायत आहे.

वडगाव (को.) - बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यात आमदार संजय शिरसाट यांच्या ग्रामविकास पॅनलने १७ पैकी सर्वाधिक अकरा जागा खेचून आणल्या. शिवसेनेच्या निष्ठावंत पॅनलला केवळ चार जागा मिळाल्या. या निवडणुकीत चुरस निर्माण केलेल्या भाजपच्या परिवर्तन पॅनलला केवळ दोनच जागा मिळाल्या. मात्र माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांच्या मराठवाडा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लोकशाही ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

विजयी उमेदवारांचा जल्लोष

उमेदवारांनी विजयी घोषित झाल्यानंतर बजाजनगरातील शिवस्मारक येथील शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. त्यानंतर जल्लोष करण्यात आला तसेच बजाजनगरसह आपापल्या वॉर्डात मिरवणुका काढण्यात आल्या.

आम्ही भगवा कायम ठेवला

आमदार संजय शिरसाट ः राजकारणापेक्षा आम्ही विकास कामावर भर देतो, आज मिळवलेले बहुमत हे विकास कामाची पावती आहे. केलेल्या विकास कामामुळेच आज आम्ही वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतवर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही फडकवलेला भगवा झेंडा कायम ठेवला. वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी आमदार संजय शिरसाट यांनी विजयी सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत विकास कामे करून बजाजनगर हे जिल्ह्यातील नंबर १ चे शहर करण्याचा मानस व्यक्त केला. तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट, राजेंद्र जंजाळ, श्रीकांत साळे, अधिक पाटील, बबन सुपेकर, सुनील काळे, पोपट हांडे आदींची उपस्थिती होती.

विजयी उमेदवार

  • वॉर्ड क्रमांक १ - सुनील चंद्रकांत काळे, सुनीता राजेश साळे, छायाताई सोमीनाथ प्रधान.

  • वॉर्ड २ - माधुरी राजन सोमासे, विष्णू रतन उगले.

  • वॉर्ड ३ - सागर पितांबर शिंदे, माया सतीश पाटील, राणी राम पाटोळे.

  • वॉर्ड ४- संभाजी हौसराव चौधरी, पूनम प्रकाश भोसले, सुरेखा अशोक लगड.

  • वॉर्ड ५ - मंदाताई कैलास भोकरे, कमलताई कल्याणराव गरड, विजय दत्तराव सरकटे.

  • वॉर्ड ६ - ज्योती श्रीकांत साळे, उषा पोपट हांडे व रामदास उत्तम गवळी.

Web Title: Aurangabad Vadgaon Bajajnagar Gram Panchayat Election Shinde Group Win

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..