Chhatrapati Sambhajinagar: पगारियाच्या गोदामाला भीषण आग;रिक्षा जळाल्या ; पेटलेल्या कचऱ्याची ठिणगी उडल्याने घटना घडल्याचा अंदाज

Multiple Fire Brigades Rush to Control Blaze: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अनेक रिक्षा जळून खाक झाल्या. कचऱ्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

गोलवाडी:कांचनवाडी परिसरातील गोलवाडी भागात असलेल्या पगारिया ऑटोच्या गोदामाला मंगळवारी (ता. २४) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. महापालिका आणि एमआयडीसीच्या १० बंबांच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. गोदामाच्या बाजूला असलेला कचरा पेटविल्यानंतर तेथील ठिणगी उडून ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाच ते सहा ऑटो जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com