Aurangabad : वाहन चालविताना कळत-नकळत चुका झाल्यास होतो ऑनलाइन दंड

ई-चलान भरा अन् चिंतामुक्त करा!
 ई-चलान
ई-चलान sakal

औरंगाबाद : वाहन चालविताना तुमच्याकडून कळत-नकळत चुका झाल्या तर तुम्हाला ऑनलाइन चालान केले जाते. अनेकांना हा ऑनलाइन दंड कसा भरावा, हेच माहीत नसते किंवा अनेकजण माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, ऑनलाइन चालानकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पुढच्यावेळी देशभरात कुठेही पोलिस किंवा आरटीओने पकडले तर पूर्वीचा दंड आणि नवीन दंड भरताना तुमचा खिसा खाली होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर दंड भरून चिंतामुक्त होण्याची गरज आहे.

दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडिंग, नो पार्किंगमध्ये पार्किंग करणे अशा अनेक कारणांमुळे पोलिस किंवा आरटीओंकडून दंड (फाइन) लावला जातो. ही दंडाची प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्याने तुम्हाला लागलेला फाइन तुमच्या वाहनाच्या नंबरला जोडला जातो आणि त्याचा एक मेसेज तुमच्या फोनवर पाठवला जातो. तेव्हा चूक झाली किंवा चूक नसतानाही फाइन लावल्याचे लक्षात येते.

वेबसाइटला द्या भेट

mahatrafficechallan.gov.in या वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला स्क्रीनवर E-Challan Payment Maharashtra State दिसेल. या स्क्रीनवर सर्वांत पहिल्यांदा तुम्हाला व्हेईकल नंबर आणि चालान नंबर हे दोन ऑप्शन दिसतात, त्यात आपण व्हेईकल नंबर हा ऑप्शन निवडायचा आहे.

हा ऑप्शन निवडल्यावर वाहनाचा नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला चेसीस नंबरचे शेवटचे चार आकडे इथे टाइप करायचे आहेत. तसेच दुसरा कॉलम व्हूचा असतो त्याखाली डोळ्याचे चिन्ह असते, त्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही त्या चालनाची सविस्तर माहिती बघू शकता. त्यात चालान नंबर, चालनाची तारीख, ड्रायव्हिंग लायसन नंबर, वाहनाचा नंबर, पेमेंट स्टेटस, चालान पैसे, चालनाची जागा, पुरावे, चालनाची कारणे दिसतात.

असा भरा दंड

वेबसाइट पेज ओपन केल्यानंतर फाइनवर टिक करून, त्यावर असलेले सिलेक्ट ई-चालान ॲण्ड क्लिक हेअर टू पे (Select echallans & Click here to pay) हे बटन क्लिक करावे लागते. त्यानंतर पेमेंटच्या टर्म ॲण्ड कंडिशन सेक्युरिटी पॉलिसी (Terms and conditions, Security Policy) वाचून नंतर ॲग्री (Agree) ऑप्शनवर टिक करायची आहे. नंतर येणाऱ्या उजव्या बाजूला Pay Now चे बटनवर त्यानंतर तुम्हाला Pay Through BillDesk या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. पुढे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्यूआर कोड (QR Code) या ऑप्शनद्वारे पेमेंट करता येते.

तक्रारही करता येते

वेबसाइटवरील माहितीमध्ये पुरावे (Evidences) भागात क्लिक केल्यावर तुमच्या वाहनाचा चालान फाडण्यावेळचा फोटो जोडलेला असतो. तर हा फोटो तुमचा नसेल तर तुम्ही तक्रार करू शकतात. या तक्रारीसाठी Grievance चा ऑप्शन असेल तिथे आपण तक्रार दाखल करू शकता.

पावतीही मिळते लगेच

पेमेंट पूर्ण झाल्यावर पेमेंट सक्सेस फुलची स्क्रीन दिसेल. त्या हिरव्या लाइनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची पावती दिसेल. नंतर ती पावतीही डाऊनलोड करता येते. त्यानंतर तुम्ही परत वेबसाइटवर जाऊन वाहनाचा क्रमांक आणि चालान क्रमांक टाकून स्टेटस पाहू शकता. याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या कुठल्याही ट्रॅफिक पोलिसांकडे जाऊन त्यांच्या ई-चलन मशीनद्वारेही दंड भरून सुटका करून घेता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com