औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करून पती फरार

पोलिसांनी नगर जिल्हा पिंजून काढत शोध सुरु
wife murder case
wife murder casesakal
Updated on

औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रेल्वेस्टेशन परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली होती. बिल्कीस ऊर्फ मीना मच्छिंद्र पिटेकर (५० रा. राहुलनगर, रेल्वेस्टेशन परिसर) असे मृत महिलेचे नाव तर मच्छिंद्र पिराजी पिटेकर (६०, रा. चिलेखनवाडी, ता.नेवासा, ह.मु राहुलनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. मच्छिंद्रच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन पथकांनी नगर जिल्हा पिंजून काढला पण अद्यापही मारेकरी पिटेकर हा हाती लागलेला नाही मात्र, लवकरच त्याला पकडण्यात येईल असे सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सोमवारी सांगितले.

मच्छिंद्र हा मोलमजुरीसाठी नगरजिल्ह्यातून औरंगाबाद शहरात आला होता. रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर भागात तो पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होता. पत्नी बिल्कीस सोबत त्याचा प्रेम विवाह झाला होता. या लग्नापूर्वी बिल्कीस यांना शमा रफिक शेख नावाची एक मुलगी होती तर प्रेमविवाहानंतर एक मुलगी शिवकन्या संजय सिंह आणि मुलगा जालिंदर हे दोन अपत्ये आहेत. लग्न झाल्यानंतर हे दोघेही नगरला राहतात.

तर शमा शेख ही औरंगाबादमध्ये राहते. मृत बिल्कीस आणि मुलगी शमा हे दोन्ही मजुरीला जात होते. गेल्या काही दिवसांपासून मच्छिंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर संयश घेत होता. यावरून दोघांमध्ये शनिवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हे भांडण मिटविले. परंतु रात्री बिल्कीस झोपलेल्या असताना मच्छिंद्र याने घरातील दगडी खलबता बिल्कीस हिच्या डोक्यावर व तोंडावर मारला. यात बिल्कीस यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मच्छिंद्रने घराचा दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पसार झाला होता.

तीन पथके करताहेत शोधाशोध

आरोपी मच्छिंद्र याच्या शोधासाठी सातारा पोलिसांची दोन पथके तर गुन्हे शाखेचे एक पथक त्याचा सर्वत्र शोध घेत आहे. नगर जिल्ह्यातील त्याचे नातेवाईक असलेल्या शेवगाव, पैठण, नेवासा तसेच नगर शहरातील विविध भागांत दोन पथकांनी रविवार आणि सोमवारी परिसर पिंजून काढला मात्र त्याचा काहीच सुगावा लागला नाही. तिसरे पथक शहर व परिसरात देखील मच्छिंद्र याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com