Aurangabad : महिलेची आत्महत्या, चार जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिघ जणांना अटक

Aurangabad : महिलेची आत्महत्या, चार जणांना अटक

औरंगाबाद : पतीसह शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांना मंगळवार (ता. सहा) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी दिले.

पती दिपक मनोहर काळे (वय ४२), अशोक तुकाराम शेळके (वय ४७), गोकुळ अशोक शेळके (वय १९) आणि एक महिला (वय ४०, सर्व रा. साखेडा मांडवा ता. गंगापुर) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सहाय्यक फौजदार नारायण दशरथ गायके या पोलिसावरही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. प्रकरणात सविता यांचा भाऊ श्‍यामसुंदर विश्‍वनाथ काकडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बेगमपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. न्यायालयात सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी युक्तीवाद केला.

Web Title: Aurangabad Woman Commits Suicide Four Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..