
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेअंतर्गत तज्ज्ञ समितीने २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात सरासरीएवढा पाऊस, कमाल व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडिपीचा फायदा घेत शेतीची कामे नियोजनबद्धपणे करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.