अविनाश पाठकला जामीन

अविनाश पाठकला जामीन
Published on: 
तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला जामीन बीड, ता.१४ : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन संपादनात कोट्यवधी रुपयांच्या कथित वाढीव मोबदल्यावरून राज्यभरात गाजलेल्या गैरव्यवहार प्रकरणात बीडचा तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला अखेर काहीसा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी त्याच्या जामीन अर्जावर शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक महिन्यांपासून तो कारागृहात होता. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनींच्या १५४ प्रकरणांमध्ये कथितरीत्या जुन्या तारखांचे बनावट निवाडे (अवॉर्ड) तयार करण्यात आले होते. याद्वारे तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांची वाढीव भरपाई नियमबाह्यरीत्या मंजूर करून, त्यातील ७३ कोटी ४ लाख रुपयांची थेट उचल करण्यात आल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला होता. या गैरव्यवहाराची तीव्रता समोर आल्यानंतर बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी पाठकसह संबंधित अधिकारी व मध्यस्थांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि प्रशासकीय सहभागाचे गांभीर्य पाहून शासनाने तपासाची सूत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविली होती. एसआयटीने लातूरमधून पाठकला ताब्यात घेतले होते. तपासात संगणकीय नोंदी, डिजिटल पुरावे आणि मूळ महसुली नस्त्यांमध्ये झालेल्या फेरफारची पडताळणी करण्यात आली होती. जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयापासून सुरू झालेली कायदेशीर लढाई अखेर उच्च न्यायालयात पोचली. जिथे दोन्ही बाजूंच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com