ज्ञानोपासक महाविद्यालयात व्याख्यान
जिंतूर ः ज्ञानोपासक महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी (ता.सात) रोजी जनशक्ती वाचक चळवळीचे प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांचे विशेष व्याख्यान झाले. मराठी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बी.रघुनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीकांत उमरीकर म्हणाले की, बी. रघुनाथ यांच्या कादंबरी लेखनातून मराठवाड्याची प्रादेशिकता आढळते. विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या शाखेपुरते मर्यादित न राहता आंतरविद्याशाखीय अभ्यास करावा.ज्यामुळे अभ्यासाची व संशोधनाची अनेक दालने खुली होतात, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. भोंबे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विषय घेऊन त्यावर लिहून व्यक्त झाले पाहिजे. त्यातून संशोधनाची एक दृष्टी मिळत असते. यावेळी प्रकाश मोरे, वैभव मोरे, उमेश मोरे या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी बी. रघुनाथ यांच्या साहित्यावर आधारित तयार केलेल्या भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले. तर बालासाहेब जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण पुरी तर आभार प्रा. संतोष कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. मदन जाधव, प्रा. डॉ. गजानन दांडेगावकर, ऋषिकेश नागरे, महादेव घुगे, अनिल वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
---------------