((((मार्केट बझ)))
-----
ABD26J81648
(((फोटो ओळ))) छत्रपती संभाजीनगर ः मार्गदर्शन करताना डॉ. शेख मोहम्मद एजाज. व्यासपीठावर रंगनाथ काळे, प्रकाश काळे, ज्ञानेश्वर भांदरगे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, हर्षचंद्र लघाने, तुकाराम पाटील, सुभाष चौधरी, विलासचंद्र काबरा आदी.
----
बाबूराव काळे यांचे मराठवाडा
मुक्तिसंग्रामातील योगदान महत्त्वाचे
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : ‘‘समाजकारण आणि राजकारणातील बाबूराव काळे ऊर्फ अप्पासाहेब यांचे योगदान महत्त्वाचे आहे’’, असे प्रा.डॉ. शेख मोहम्मद एजाज म्हणाले.
अजिंठा शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात अप्पासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. एजाज यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अप्पासाहेबांच्या योगदानावर प्रकाश टाकला. डॉ. विनोद बोरसे यांनी चित्रफितीद्वारे सोयगावमधील सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, शेंदुर्णीतील शस्त्र प्रशिक्षण शिबिर आणि वाकोड छावणीची माहिती दिली. द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी अप्पासाहेबांच्या नेतृत्वाचा गौरव केला. संस्थाध्यक्ष रंगनाथ काळे यांनी सोयगाव येथे अप्पासाहेबांच्या नावाने ग्रंथालय उभारण्याची घोषणा केली. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर भांदरगे होते. यावेळी सचिव प्रकाश काळे, हर्षचंद्र लघाने, तुकाराम पाटील, सुभाष चौधरी, विलासचंद्र काबरा, डॉ. अशोक नाईकवाडे, डॉ. संजय मून, प्राचार्य डी.बी. चौधरी, गुलशन पवार, प्राचार्य डॉ. पंडित नलावडे, प्राचार्य डॉ. अन्वरसाब नरेगल, प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, उपप्राचार्य रवी कुमार गोटेड, प्राचार्य डॉ. राजेश यादव, प्राचार्य डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. एम.आर. खान, पंकज साबळे, जय सोने आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पंडित नलावडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिल्पा जिवरग यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. दिलीप बिरुटे यांनी जीवनपट सादरीकरण केला. प्रा. देवरे यांनी आभार मानले.