Money Bag Controversy: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा "पैशाच्या बँगसह" व्हिडिओ शेअर केल्याने वादळ निर्माण झाले आहे. या व्हिडिओमुळे आधीच प्राप्तिकर नोटीसेमुळे चर्चेत असलेले शिरसाट पुन्हा अडचणीत आले.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बँगसोबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल केल्याने एकच खळबळ निर्माण झाली.