प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन
Published on
ABD26J79850 ABD26J79849 ABD26J79848 ABD26J79847 छत्रपती संभाजीनगर ः बजाज कंपनीच्या गेटसमोर सुरू असलेले टीम लीजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन. ------- प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन बजाज गेटसमोर घोषणाबाजी ः पहाटे पाचपासून ठिय्या छत्रपती संभाजीनगर, ता. २० ः बजाज कंपनीसमोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रविवारी पहाटे पाचपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. ११ ऑगस्टला आंदोलन करूनही मागण्या मान्य झाल्या नाही. शिवाय आंदोलनातील सक्रिय प्रशिक्षणार्थींना टार्गेट केले जात असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थ्यांनी केला. या आंदोलनामुळे सकाळपासून राज्य राखीव पोलिस दल आणि वाळूज एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांचा मोठा फौजफाटा बजाज कंपनीच्या गेटसमोर उभा होता. ---------- काय आहे प्रकरण? २०२३ मध्ये बजाज कंपनीसोबत टीम लीज फाउंडेशन या संस्थेशी करार झाला. त्यानुसार ऑन जॉब ट्रेनिंगच्या धर्तीवर बीएसस्सी मॅकेट्रॉनिक्स या पदवीसाठी विद्यार्थ्यांची भरती टीम लीज कंपनीने इन्‍स्टाग्रामवर जाहिरातीद्वारे केली. त्यानुसार राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणार्थींना पहिल्या दिवसापासून बजाज कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायला सुरवात केली. मात्र, तीन वर्षे सरण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना एका हॉटेलवर बोलावून त्यांच्याकडून पहिल्या विद्यापीठाला स्वखुशीने सोडत असल्याचे लिहून घेत दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घेत असल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षे सरली. प्रशिक्षणार्थींचा काळ संपला पण पदवी मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित केले. दरम्यान, मनसेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. २५ ऑगस्टला विशाल बर्डे, श्रद्धा साळुंके, प्रिया भंडारी, भारत डोरले, शरद चौधरी, भरत उगले, जयश्री भोंडे, दीक्षा वानखेडे, ऋत्विक काथार, अभंग दालू या दहा प्रशिक्षणार्थींनी राज ठाकरे यांची भेट घेत कैफियत मांडली. त्यांनी चार सप्टेंबरला कंपनी मालकाला भेटणार असून त्यावेळी हा प्रश्‍न मांडू असे सांगितले. प्रशिक्षणार्थींना केले जाते टार्गेट ः कंपनीत प्रशिक्षणार्थींना टार्गेट केले जात असून त्यांचे विभाग बदलण्यात आले. शनिवारी टीम लीज कंपनीचे सुपरवायझर विद्यार्थी प्रतिनिधी गणेश कावळे यांच्या खोलीवर २० ते २५ जण घेऊन समजवण्यासाठी आले होते, असा आरोप करत कंपनीतील प्रकरण घरापर्यंत का, असा सवाल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी करत जिवाला धोका असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. दरम्यान, मनसेचे राजू घोरपडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत आम्ही पाठीशी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना धीर दिला. ----- ABD26J79852 गणेश कावळे (विद्यार्थी प्रतिनिधी) ः टीम लीजचे सुपरवायझर कुणाल गाडेकर हे शनिवारी (ता. १९) २०-२५ जणांना घेऊन माझ्या रूमवर समजविण्यासाठी आले होते. बरे झाले मी रूमवर नव्हतो. कंपनीचा विषय बाहेर, घरापर्यंत का आणताहेत कळले नाही. धमकावण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या जीविताला धोका आहे. ----- ABD26J79853 ऋत्विक काथार (प्रशिक्षणार्थी) ः कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मला जातीवरून बोलून हिणवले. शिवाय एका वकिलाने मला चर्चेसाठी डिस्कशन रूममध्ये नेऊन माझ्या कानशिलात लगावली. आम्ही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहोत शिकवण्‍यापेक्षा कामगारांपेक्षा अधिक काम करून घेताहेत. ------ ABD26J79851 प्रतीक मानकर (आंदोलनकर्ता) ः मी तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर जाहिरात पाहून आलो. कामासोबत डिग्री मिळेल असे वाटले होते. तीन वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. दरम्यान, जेएनयू विद्यापीठातून प्रवेश स्वखुशीने प्रवेश काढत असल्याचे लिहून घेतले नंतर ऑर्किड विद्यापीठात प्रवेश घेतो म्हणून सांगितले. तीन वर्षे पूर्ण झाली पण कोणतीही पदवी मिळाली नाही. आंदोलन केले म्हणून प्रशिक्षणही खंडित केले. --------- ABD26J79854 दीक्षा वानखेडे (प्रशिक्षणार्थी) ः मुली, लग्न झालेल्या महिला पदवीसोबत स्टायपेंडही भेटेल यासाठी जॉइन झालो. कुठलीही पदवी मिळाली नाही. तीन वर्षे काम करून आता सहा महिने वाढवून मिळाले. त्यातील दोन महिनेही संपले आता चार महिने बाकी आहेत. कामगारांपेक्षाही जास्त काम प्रशिक्षणार्थींकडून करून घेताहेत. पण, कामगाराच्या सुविधा पण देत नाही. कँटीनच्या वारंवार तक्रारी केल्या पण, काही उपयोग झाला नाही. आता आंदोलनकर्त्यांवर दबाव टाकणे, त्यांचे काम बदलणे असा त्रास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com