‘बळीराजा आधार’ उपक्रमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

‘बळीराजा आधार’ उपक्रमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
Published on: 
‘बळिराजा आधार’मधून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात ---- माहूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा सामाजिक उपक्रम ----- सारखणी, ता.१५ (बातमीदार) : श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ‘बळीराजा आधार, एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंददायी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निसर्गाची अनिश्चितता, पावसाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करता यावी, या भावनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संवेदनशील नागरिकांनीही ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून बळिराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री रेणुका माता नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण ठरत आहे. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, एस. एस. पाटील, काशीनाथ थोटे, संतोष मोहन चव्हाण, बालाजी येरमे, सुरोशे आणि मास्तुरे आदी उपस्थित होते. बळिराजाच्या कष्टांचा सन्मान करून त्यांची दिवाळी आनंदमय करण्याचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com