बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत  यश
Published on: 
बाळकृष्ण महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश परभणी ः झिरोफाटा येथील बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत, तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रशालेच्या लक्ष्मण बुरकुले याने २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर ४ बाय ०० मीटर रिले स्पर्धेत आकाश ढुमणे, विशाल तांबारे, सुनील कुरुडे,मारुती बुरकुले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पूर्णा येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ८०० मिटर धावण्याच्य स्पर्धेत प्रीती बुरकुले हिेने प्रथम क्रमांक तर नरहरी कराळे याने मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. विविध वयोगटात विशाल तांबारे याने १०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. रूपाली गडदे हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, गोळा फेक प्रीती बुरकुले व सुकेशना दांडेगावकर, मारुती बरकुले यांनी प्रथम, उंच उडीत सॅम्युएल जामुनकर याने प्रथम, थाळीफेक मध्ये योगेश टार्फे व आकाश ढुमणे याने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे संस्था अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, सचिव रत्नमाला भालेराव यांनी अभिनंदन केले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com