औरंगाबाद विद्यापीठाचा गर्जे महाराष्ट्रसोबत करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bamu

औरंगाबाद विद्यापीठाचा गर्जे महाराष्ट्रसोबत करार

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आणि अमेरिकास्थित ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन ॲकॅडमीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. जागतिक पातळीवर कार्यरत उद्योजक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेली संस्था आता विद्यापीठाला जोडली गेल्याने नवउद्योजकांना (start up) संधी उपलब्ध झाली आहे.

‘स्टार्टअप अ‍ॅक्सलेटर प्रोग्रॅम’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहोत. अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रविवारी (ता. नऊ) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘गर्जे मराठी’चे अध्यक्ष आनंद गाणू, सुधीर कदम (सॅनफ्रान्सिस्को, अमेरिका) आणि अलंकार जोशी (सिंगापूर) यांनी सहभागी घेतला. प्र-कुलगुरू डॉ. श्‍याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, संयोजक डॉ. सचिन देशमुख, संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

‘गर्जे महाराष्ट्र’तर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवा नि:शुल्क असतील. संस्थेचे संस्थापक आनंद गानू आहेत. तर प्रकल्पाचे संचालक अलंकार जोशी आणि सुधीर कदम करीत आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी, संशोधक यांच्यात मोठी क्षमता असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवोद्योजकांसाठी सोळा आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क उपलब्ध करण्यात आला आहे, असे सुधीर कदम म्हणाले. ‘मॅजिक’च्या माध्यमातूनही नवउद्योजकांना मार्गदर्शन होणार आहे. सोळा आठवड्यांच्या प्रशिक्षण सहभागाकरिता https://forms.gle/jf5kPEuyaJ8yZLxw6 या संकेतस्थळावर फॉर्म भरावा.

हेही वाचा: दिलासादायक! बाधितांची संख्या घटल्याने औरंगाबादेतील दहा कोवीड केअर सेंटर बंद

सात नवउद्योजकांना सहकार्य
करारांतर्गत महेश शेळके, डॉ. वैशाली इंगळे, कृष्णा जाधव यांना सहकार्य केले आहे. तर सुरेश सोरमारे (सेहत इझी), सागर इंगळे (किक स्टँड टेक्नॉलॉजी), योगेश गावंडे (नियो इंजिनिअर्स) आणि स्वप्नील कालरा (द फार्म फूड) यांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे बजाज इन्क्युबुशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top