BAMU: मराठवाडा विद्यापीठाची देशात फडकली पताका! टॉप यादीत २८ वा क्रमांक, ‘एनआरआयएफ रॅंकिंग’ही वाढण्याची शक्यता
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘आउटलूक-आय केअर’ राष्ट्रीय क्रमवारीत देशात २८ वा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शैक्षणिक व संशोधन उत्कृष्टतेमुळे मराठवाड्याचा मान उंचावला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक राज्य विद्यापीठांतून टॉप ७५ विद्यापीठांची ‘आउटलूक-आय केअर’ने २०२५ ची क्रमवारी जाहीर केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (८७१.४६ गुणांसह) देशात २८ वा क्रमांक पटकावला.