
छत्रपती संभाजीनगर : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बनावट औषधांचे कनेक्शन आता घाटी रुग्णालयापर्यंत पोचले. दोन्ही ठिकाणी औषधींचा पुरवठा करणारा ठेकेदार एकच असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, तब्बल ३३ प्रकारच्या औषधींचा वापर थांबविण्यात आला. या औषधींची आता तपासणी केली जाणार आहे.