esakal | नदीपात्रात वाहून गेला बॅंक व्यवस्थापक, पंधरा तासांनंतर सापडला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

kelna River

औरंगाबाद जिल्ह्याच्या हट्टी परिसरातील केळणा नदीपात्रातील पाण्यात बुडून बॅंकेच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२१) समोर आली.

नदीपात्रात वाहून गेला बॅंक व्यवस्थापक, पंधरा तासांनंतर सापडला मृतदेह

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : हट्टी (ता.सिल्लोड) परिसरातील केळणा नदीपात्रातील पाण्यात बुडून बॅंकेच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २१) समोर आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंभई येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखा व्यवस्थापक तुषार खैरनार (वय ३५, सध्या रा.सिल्लोड, मूळगाव निमगाव, ता.मालेगाव, जिल्हा नाशिक) हे सिल्लोडहून अंभई येथे अप-डाऊन करायचे. गुरूवारी (ता.२०) रात्री अकराच्या सुमारास त्यांची दुचाकी हट्टी येथील केळणा नदीच्या पुलावर बेवारस अवस्थेत आढळून आली.

पोलिस अधीक्षकांसह महापालिका प्रशासक पुन्हा क्वारंटाईन

शुक्रवारी (ता.२१) सकाळी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर औरंगाबाद येथून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी नदीपात्राच्या परिसरात शोध घेतल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मृतदेह सापडला. घटनास्थळी सकाळीच महसूल विभागाचे नायब तहसिलदार विनोद करमणकर, मंडळ अधिकारी आर.एम.ससाणे, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. परतु त्यांना यश आले नाही.

त्यानंतर औरंगाबाद येथून आलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी मोहन मुंगसे, इसाक शेख, प्रसाद शिंदे, दिनेश मुगसे, संग्राम मोरे, राम सोनवणे, शिवसंभा कल्याणकर, मनोज शेजूळे व वाहनचालक असिफ शेख यांनी नदीपात्रातील पाण्यात शोध घेतल्यानंतर पंधरा तासांच्या प्रयत्नांनतर मृतदेह मिळाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिल्लोड येथिल उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image
go to top