esakal | सोयगाव-चाळीसगाव रस्ता खचल्याने बनोटीची वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

soygaon

सोयगाव-चाळीसगाव रस्ता खचल्याने बनोटीची वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्ग खचल्याने सोयगाववरून चाळीसगावकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. सोयगावसह तालुकाभर संततधार पावसाने थैमान घातल्याने सोयगाव-चाळीसगाव रस्त्याच्या कडा ढासळल्याने चाळीसगाव रस्ता धोकादायक झाला आहे. या रस्त्याच्या कडेला असलेला भराव वाहून गेला असून रस्ताही खचल्याने वाहतूक ठप्प झाली असून सार्वजनिक विभागाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त प्रवाशांनी केला आहे. बनोटी-गोंदेगाव वरून सोयगावला येण्यासाठी पाचोरा मार्गे सोयगावला यावे लागत असून या परिसरातील नागरिकांना तालुक्यावर येण्यासाठी फेऱ्यांच्या रस्त्याने तालुक्यावर यावे लागत आहे. सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावरील नळकांडी पूलही धोकादायक झालेली आहे. त्यामुळे पूल खचण्याची भीती व्यक्त होत आहे. (Aurangabad News)

हेही वाचा: टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले

औरंगाबाद शहरात दुसऱ्या दिवशी पाऊस

औरंगाबाद : शहरात मंगळवारी काही भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर बुधवार (ता.१) रोजी पावसाने हजेरी लावली शहरातील अनेक भागात हलका पाऊस झाला. चिकलठाणा वेधशाळेत बुधवार (ता.१) रात्री साडेआठ पर्यंत ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झालेला शेतीचे नुकसान सुद्धा झालेले आहे.

loading image
go to top