कौडगाव येथे जुन्या वादातून तरुणासह भावावर जीवघेणा हल्ला बार्शीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल

कौडगाव येथे जुन्या वादातून  तरुणासह भावावर जीवघेणा हल्ला  बार्शीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल
Published on: 
जुन्या वादातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला ----- बार्शीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल ------ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २८ ः कंपनीतून कामावरून काढून टाकल्याच्या संशयावरून कौडगाव एमआयडीसी परिसरात दोन भावांवर दगड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात बार्शी तालुक्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कौडगाव एमआयडीसी परिसरात घडली. तांबेवाडी तांडा (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील रहिवासी फिर्यादी कृष्णा धोंडिराम पवार (वय २९) आणि त्यांचा भाऊ रोहिदास ऊर्फ रवी धोंडिराम पवार यांच्यावर हा हल्ला झाला. संशयित आरोपी विठ्ठल विनायक राठोड, तुकाराम विनायक राठोड, विनायक देविदास राठोड, मनीषा विठ्ठल राठोड आणि ताराबाई विठ्ठल राठोड (सर्व रा. तांबेवाडी तांडा, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी हा हल्ला केला. फिर्यादीच्या भावाने विठ्ठल राठोड याला कंपनीतून काढून टाकण्यास मालकाला सांगितले, या संशयावरून आरोपींनी दोन्ही भावांना अडवून अर्वाच्‍य भाषेत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी जखमी कृष्णा पवार यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार, धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com