
विहामांडवाः आनंदपूर/शृंगारवाडी तालुका पैठण ग्रामपंचायतीला सण २०२१-२२ या वर्षाचा आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दहा लाख रुपये प्रमाणपत्र व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ओमप्रसाद रामावत, गटविकास अधिकारी उषा मोरे, कक्ष अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी एस. एल. इंगळे, डी. टी. गवळी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
सरपंच वर्षा खराद, माजी सरपंच संगीता खराद, उपसरपंच मीरा चींधे, ग्रामसेवक सागर डोईफोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी सभापती विलास भुमरे, नामदेव खराद आदींची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.