ABD26J77959 ((((ओव्हरसेट)))
सिडको : मेकअप करताना ब्यूटिशियन. ABD26J77960 हेअर स्टाइल करताना ब्यूटिशियन.
---
ब्यूटिशियनच्या हातून ‘ब्यूटी इकॉनॉमी’ला आकार
---
शहरात अडीच हजार पार्लर; महिन्याला २३ कोटींची उलाढाल
---
दिव्या तौर ः सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : बदलती जीवनशैली, सोशल मीडियाचा प्रभाव आणि सौंदर्यविषयक जनजागृतीमुळे शहरातील ब्यूटी पार्लर व्यवसायाचे स्वरूप पार बदलून गेले. फेशियल आणि थ्रेडिंगपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता ‘पर्सनल केअर’ आणि प्रीमियम सेवांपर्यंत विस्तारला आहे. अडीच हजार पार्लर्सच्या जाळ्याद्वारे महिन्याला २३ कोटी, तर वर्षाला तब्बल २७६ कोटी रुपयांची उलाढाल करत महिहेला उद्योजकांनी स्थानिक अर्थव्यवस्थेत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे, असे ब्यूटिशियन सुनीता यादव यांनी सांगितले.
शहरात एक हजार पार्लरची प्रत्येकी सरासरी मासिक उलाढाल अंदाजे सरासरी ८० हजार रुपये, तर दीड हजार पार्लरची सरासरी उलाढाल एक लाख रुपये आहे. म्हणजेच वर्षभरात ही उलाढाल सुमारे २७६ कोटी रुपयांपर्यंत पोचते. प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पार्लरची संख्या आणखी वाढणार आहे. एकेकाळी घरगुती व्यवसाय म्हणून सुरू झालेला ब्यूटी पार्लरचा व्यवसाय आता महिलांसाठी रोजगारासोबतच स्वतंत्र उद्योजकतेचे क्षेत्र बनला आहे. ब्यूटी पार्लरचा व्यवसाय आता केवळ फेशियल, थ्रेडिंग आणि हेअर कटपुरता मर्यादित राहिलेला नाही. हेअर कलर, हेअर स्पा, स्मूथनिंग, केराटिन, हेअर ट्रीटमेंट, नेल आर्ट, ब्रायडल पॅकेज आणि प्रीमियम फेशियल अशा सेवांमुळे उत्पन्नाचे स्वरूप बदलले आहे. शहरातील तरुणी, नोकरदार महिला व विद्यार्थिनींमध्ये सोशल मीडियावरील ट्रेंडचा प्रभाव वाढल्याने या सेवांची मागणी सतत वाढत आहे.
---
गृहोद्योगातून व्यवसायाच्या विस्ताराकडे
अनेक महिलांनी घरातून मेंदी, मेकअप किंवा हेअर सर्व्हिस देण्यापासून व्यवसायाची सुरवात केली. ग्राहकसंख्या वाढल्यानंतर स्वतंत्र जागा घेऊन पार्लर सुरू करण्याचा प्रवास अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.
---
‘फक्त ब्यूटी’पासून ‘पर्सनल केअर’पर्यंत
ग्राहकांचा कलही बदलत असून, पूर्वी केवळ लग्न किंवा सणांनिमित्त घेतल्या जाणाऱ्या सौंदर्यसेवा आता नियमित स्किन केअर, हेअर केअर आणि ग्रूमिंगचा भाग बनल्या आहेत. शहरातील सलून बाजारपेठेत प्रीमियम सेवा, सोशल मीडिया आणि डिजिटल कॉमर्सचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. यामुळे ब्यूटी पार्लर हे महिलांच्या उद्योजकतेचे व स्थानिक अर्थचक्रातील महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
---
हेअर कटमध्ये काय ट्रेंडिंग?
लेअर्ड, बॉब आणि बटरफ्लाय कटला तरुणींची मोठी पसंती मिळत आहे. केसांची लांबी, चेहऱ्याचा आकार आणि व्यक्तिमत्त्वानुसार कस्टमाइज्ड हेअर कटला प्राधान्य दिले जात असून, त्यावर सेलिब्रिटी स्टाइलचा प्रभाव दिसून येत आहे.
---
महिलांसाठी रोजगाराचे मोठे क्षेत्र
या व्यवसायाचा विस्तार केवळ मालक महिलांपुरता मर्यादित न राहता ब्यूटिशियन, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, रिसेप्शनिस्ट आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधूनही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहे. शहरात अडीच हजार पार्लर्स असणे हे महिलांनी कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट केल्याचे चित्र आहे.
---
(((कोट)))
कमी गुंतवणुकीत सुरवात करणे सोपे असल्याने महिला व तरुणी या व्यवसायाकडे वळत आहेत. घरातून छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या व्यवसायाचे आज स्वतंत्र पार्लरमध्ये रूपांतर झाले आहे. या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासोबतच इतर चार महिलांना रोजगार देता येत असल्याचा मला आनंद आहे. महिन्याकाठी मला ८० हजारांचा नफा होत आहे.
-ब्यूटी पार्लर व्यावसायिक
--
पूर्वी ग्राहक केवळ फेशियल, थ्रेडिंग आणि साध्या हेअर कटपुरते मर्यादित होते. आता हेअर कलर, केराटिन, स्मूथनिंग आणि प्रीमियम सेवांची मागणी वाढली आहे. शहरात दोन हजारांपेक्षा अधिक पार्लर असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियामुळे नवीन स्टाइल लगेच लोकप्रिय होऊन ग्राहकांचा खर्चही वाढला आहे.
- अश्विनी मोरे, पार्लर व्यावसायिक