बीएडच्या तिसऱ्या यादीत २३ हजार ८८७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

बीएडच्या तिसऱ्या यादीत २३ हजार ८८७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
Published on: 
((मुख्य अंक)) -- बी.एड.साठी २३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी - छत्रपती संभाजीनगर, ता. ११ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड. अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या फेरीत २६ हजार १८७ उपलब्ध जागांपैकी २३ हजार ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. तिसऱ्या फेरीसाठी ४१ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. राज्यातील बी.एड. प्रवेशासाठी एकूण ६५ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी मुदतीत पसंतीक्रम भरलेल्या ४१ हजार ९९८ विद्यार्थ्यांचाच तिसऱ्या फेरीसाठी विचार करण्यात आला. राज्यातील ४७७ बी.एड. महाविद्यालयांमध्ये २६ हजार १८७ जागा उपलब्ध होत्या. यापूर्वी पहिल्या फेरीत सात हजार ३८३ तर दुसऱ्या फेरीत दोन हजार ४२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. १३) संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबरला रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com