Beed Fake letterpad Case
esakal
बीड : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बनावट लेटरपॅडवर खोटी स्वाक्षरी (Beed Fake letterpad Case) करून जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रकरणी माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.